Skip to content
प्रेषित ९:९-१९

प्रेषित ९:९-१९

तिथे तो तीन दिवस आंधळा होता आणि त्याने अन्न व पाणी सेवन केले नाही.
१०
आता दिमिष्क येथे हनन्याह नावाचा येशूंचा एक शिष्य होता. दृष्टान्तामध्ये प्रभूने त्याला हाक मारली, “हनन्याह!” हनन्याह उत्तर देत म्हणाला, “आज्ञा प्रभूजी.”
११
प्रभू त्याला म्हणाले, “तू सरळ नावाच्या रस्त्यावर यहूदाहच्या घरी जा. तिथे तार्सस येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, तो या घटकेला माझी प्रार्थना करीत आहे.
१२
त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.”
१३
हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे.
१४
आणि तुमच्या नावाचा धावा करणार्‍या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.”
१५
परंतु प्रभू हनन्याला म्हणाले, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएली लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे.
१६
माझ्या नावासाठी किती त्रास सहन करावा लागेल, हे मी त्याला दाखवेन.”
१७
नंतर हनन्याह त्या घरी गेला आणि त्याने घरात प्रवेश केला. त्याचे हात शौलावर ठेवीत त्याने म्हटले, “बंधू शौल, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूंनी तुला दर्शन दिले, त्यांनी मला यासाठी पाठविले आहे की, तुला आपली दृष्टी परत यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस.”
१८
त्याच क्षणी, त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीतरी पडले आणि शौलाला पुन्हा दिसू लागले. तो उठला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला,
१९
त्याने थोडेसे अन्न घेतल्यानंतर, त्याला पुन्हा शक्ती प्राप्त झाली. शौलाने दिमिष्कमध्ये अनेक दिवस शिष्यांच्या बरोबर घालविले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options