Skip to content
प्रेषित ४:२४-३१

प्रेषित ४:२४-३१

२४
त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्‍यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू, तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे.
२५
पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीदाच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे कट का रचत आहेत आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
२६
प्रभू आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी एकत्र येऊन उठाव करीत आहेत.’
२७
खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएली लोक तुमचे पवित्र सेवक येशू, ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले.
२८
तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले.
२९
तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या.
३०
तुमचे पवित्र सेवक येशूंच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.”
३१
या प्रार्थनेनंतर ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options