Skip to content
प्रेषित २५:२३-२७

प्रेषित २५:२३-२७

२३
तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.
२४
मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये.
२५
माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे.
२६
परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे चौकशी साठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल.
२७
कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options