Skip to content
प्रेषित २२:१७-२१

प्रेषित २२:१७-२१

१७
“यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली,
१८
आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’
१९
“मी उत्तर दिले, ‘प्रभू, या लोकांना माहीत आहे की, मी एका सभागृहातून दुसर्‍या सभागृहात जाऊन विश्वासणार्‍यांना मार देऊन तुरुंगात टाकीत होतो.
२०
आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’
२१
“नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options