3 योहान १:१-४
१
मंडळीचा वडील याजकडून,
२
प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.
३
जेव्हा काही विश्वासणार्यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला.
४
माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.
Settings