2 शमुवेल ७:४-१०
४
परंतु त्याच रात्री याहवेहचे वचन नाथानाकडे आले, ते असे:
५
“जा आणि माझा सेवक दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार काय?
६
इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले तेव्हापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही. मी एका ठिकाणाहून दुसरीकडे, माझे निवासस्थान म्हणून डेर्यातूनच फिरत आलो आहे.
७
जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या इस्राएली लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही अधिकार्यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे घर का बांधले नाही” असे कधी म्हटले काय?’
८
“तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.
९
जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन.
१०
आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.
Settings