2 शमुवेल २३:१४-१६
१४
त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.
१५
दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे असते!”
१६
तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.
Settings