Skip to content
2 शमुवेल १९:११-१५

2 शमुवेल १९:११-१५

११
दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?
१२
तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’
१३
आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”
१४
अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.”
१५
नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options