Skip to content
2 शमुवेल १८:१९-२३

2 शमुवेल १८:१९-२३

१९
तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”
२०
पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्‍या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.”
२१
नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.
२२
सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.”
२३
तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options