Skip to content
2 राजे ७:३-८

2 राजे ७:३-८

त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे?
जर आपण म्हणालो, ‘आपण शहरात जाऊ,’ तर तिथे दुष्काळ आहे आणि आपण तर मरणारच. येते बसून राहिलो तरीही आपण मरणारच आहोत. तर मग आपण अरामी सैन्याच्या छावणीत जाऊ आणि शरण घेऊ. त्यांनी आपल्याला जीवदान दिले, तर जिवंत राहू आणि मारून टाकले, तर आपण मरू, तर त्यात काही हरकत नाही.”
संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता,
कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.”
तेव्हा ते उठले आणि संध्याकाळी पळून गेले. त्यांनी आपले तंबू, घोडे, गाढवे यांचा त्याग केला. आपले तंबू तसेच सोडून प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पलायन केले.
जेव्हा हे कुष्ठरोगी अरामी छावणीच्या सीमेजवळ आले, तेव्हा त्यांनी एका तंबूत घुसून खाणेपिणे केले. त्यांनी चांदी, सोने आणि कपडे गोळा करून ते लपवून ठेवले. ते परत येऊन दुसर्‍या तंबूत गेले आणि त्यातून काही वस्तू घेतल्या आणि त्यादेखील लपवून ठेवल्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options