८
यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.”
९
त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदीयाचा राजा आणि एदोमाचा राजा यांच्यासोबत निघाला. सात दिवसाच्या फेरीनंतर, सैनिकांजवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांसाठी पाणी उरले नाही.