मुख्य मजकुरावर जा
2 राजे २५:२२-२६

गदल्या राज्यपाल नेमला जातो

2 राजे २५:२२-२६
२२
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने शाफानचा पुत्र अहीकामचा पुत्र गदल्याहला, यहूदीयाहमध्ये उरलेल्या लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त केले.
२३
जेव्हा सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने गदल्याहची राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कारेहचा पुत्र योहानान, नटोफाथी तन्हुमेथचा पुत्र सेरायाह आणि माकाथीचा पुत्र याजन्याह आणि त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले.
२४
त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी गदल्याहने शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्‍यांना भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा आणि तुमचे बरे होईल.”
२५
परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याहचा पुत्र इश्माएल जो राजघराण्यातील एक होता, आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन आला आणि त्याने गदल्याह व यहूदी लोकांना व बाबेलच्या लोकांना जे मिस्पाह येथे होते त्यांना ठार मारले.
२६
मग सेनाधिकार्‍यांसह, लहानमोठे सर्व लोक खास्द्यांच्या भीतीने इजिप्तला पळून गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options