Skip to content
2 राजे २३:५-८

2 राजे २३:५-८

यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.
त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली.
याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.
यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options