Skip to content
2 राजे २१:१०-१८

2 राजे २१:१०-१८

१०
त्यावेळी याहवेहने आपले सेवक संदेष्ट्यांद्वारे म्हटले होते:
११
“यहूदीयाचा राजा मनश्शेह यानेही अमंगळ कृत्ये केली आहेत. एवढेच नाही, त्याने त्याच्या आधीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्ट कर्मे केली आहेत आणि त्याने यहूदी लोकांना आपल्या मूर्तींसाठी तेच पाप करण्यास लावले.
१२
म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील.
१३
मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन.
१४
मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील;
१५
त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.”
१६
शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
१७
मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय?
१८
मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options