Skip to content
2 राजे १४:१-४

2 राजे १४:१-४

यहोआहाजचा पुत्र इस्राएलाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह राज्य करू लागला.
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती.
त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले.
तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options