Skip to content
2 राजे ११:१७-२१

2 राजे ११:१७-२१

१७
मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला.
१८
देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला. मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
१९
त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, गारदी, पहारेकरी आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि एकत्र जाऊन याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले आणि पहारेकर्‍यांच्या द्वारातून प्रवेश करीत राजवाड्यात गेले. मग राजाने राजासनावर आपले स्थान घेतले.
२०
राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.
२१
वयाच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options