मुख्य मजकुरावर जा
2 राजे १:२-८

अहज्या बाल-जबूबाचा सल्ला घेतो

2 राजे १:२-८
अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.”
परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राजाच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’
म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.
जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?”
त्यांनी उत्तर दिले, “वाटेत आम्हाला एक मनुष्य भेटण्यास आला, तो म्हणाला, ‘ज्या राजाने तुम्हाला पाठविले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, “याहवेहचा हा संदेश आहे: इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारतोस? म्हणून तू ज्या अंथरुणावर पडून आहेस, त्या अंथरुणावरून उठणार नाहीस. तू खात्रीने मरशील!” ’ ”
राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?”
त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा घातला होता आणि चामड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options