Skip to content
2 इतिहास ३५:१८-२०

2 इतिहास ३५:१८-२०

१८
शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून इस्राएलमध्ये अशा प्रकारे वल्हांडण सण साजरा करण्यात आला नव्हता; आणि योशीयाहने ज्याप्रकारे याजक, लेवी आणि सर्व यहूदीया आणि इस्राएली लोक जे यरुशलेममध्ये होते, त्यांच्याबरोबर सण साजरा केला होता तसा वल्हांडण इस्राएलच्या कोणत्याही राजांनी कधीही केला नव्हता.
१९
हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला.
२०
या सर्व गोष्टीनंतर, जेव्हा योशीयाहने मंदिराची सेवा व्यवस्थित केल्यानंतर तेव्हा इजिप्तचा राजा नखो फरात नदीवर असलेल्या कर्कमीश येथे त्याच्याशी लढण्यास गेला आणि योशीयाह त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options