2 इतिहास ३५:१-३
१
योशीयाहने यरुशलेममध्ये याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा केला आणि वल्हांडणाचे कोकरू पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी कापले गेले.
२
त्याने याजकांना त्यांना दिलेल्या कामासाठी नियुक्त केले आणि याहवेहच्या मंदिराच्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहित केले.
३
ज्यांनी सर्व इस्राएली लोकांना आज्ञा केली होती आणि ज्यांना याहवेहसाठी पवित्र केले गेले होते, त्या लेवी लोकांना म्हणाला: “इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा. ते तुमच्या खांद्यावर वाहून नेण्यासारखे नाही. आता तुमचे परमेश्वर याहवेह आणि त्यांचे इस्राएली लोक यांची सेवा करा.
Settings