2 इतिहास २१:५-६
५
जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले.
६
अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.