Skip to content
2 इतिहास १७:१०-१९

2 इतिहास १७:१०-१९

१०
यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत.
११
काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.
१२
यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली
१३
आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले.
१४
कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती: यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती: अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती;
१५
त्यानंतर यहोहानान हा 2,80,000 सैनिकांवर सेनापती;
१६
त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते.
१७
बिन्यामीनकडून: एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्‍यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष;
१८
त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष.
१९
या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options