प्रेम, परिश्रम आणि शांत जीवन
९
एकमेकांवर प्रीती करण्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच तुम्ही परमेश्वरापासून शिकला आहात.
१०
आणि वास्तविक, मासेदोनिया प्रांतातील परमेश्वराच्या सर्व कुटुंबावर तुम्ही प्रीती करीत आहात. तरी बंधू आणि भगिनींनो आम्ही विनंती करतो, ती अधिकाधिक करावी.
११
शांतीने जीवन जगणे, आपल्या व्यवसायात मग्न असणे आणि स्वतःच्या हाताने काम करणे हे तुमचे ध्येय असू द्या,
१२
म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
Settings