संदेष्ट्यांनी या तारणाची पूर्वघोषणा केली
१०
तुमच्याकडे जी येणार होती, त्या कृपेबद्दल ज्या संदेष्ट्यांनी तुम्हाला सांगितले, त्यांनी या तारणासंबंधी लक्षपूर्वक शोध घेतला आणि मोठ्या काळजीने,
११
त्यांच्यामध्ये असणार्या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे त्यांनी ख्रिस्ताचे दुःखसहन आणि त्यानंतर येणार्या गौरवी गोष्टीबद्दल भविष्य केले, तेव्हा त्यांनी ती वेळ आणि परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न केला.
१२
ते त्यांना यासाठी प्रकट केले होते की, ते स्वतःची सेवा नव्हे तर तुमची करीत होते. ते ज्या गोष्टींविषयी बोलले होते, त्या गोष्टी तुम्हाला स्वर्गातून पाठविलेल्या पवित्र आत्म्याद्वारे, ज्यांनी शुभवार्तेची घोषणा केली त्यांच्याद्वारे तुम्हाला आता सांगितल्या आहेत. स्वर्गदूतांना सुद्धा या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती.
Settings