Skip to content
1 राजे ८:६-११

1 राजे ८:६-११

६
नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.
७
करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे आच्छादले जात होते.
८
ते दांडे इतके लांब होते की, त्यांची टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असत, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ती दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत.
९
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन दगडी पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.
१०
जेव्हा याजक पवित्रस्थानातून बाहेर आले, तेव्हा याहवेहचे मंदिर मेघाने भरले.
११
आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने याहवेहचे मंदिर भरले होते.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.