1 राजे ६:२४-२८
२४
पहिल्या करुबाचे एक पंख पाच हात आणि दुसरे पंख पाच हात लांब होते; एका पंखाच्या टोकापासून दुसर्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
२५
दुसरा करूब सुद्धा दहा हाताच्या मापाचा होता, कारण दोन्ही करूब एकसारख्याच मापाचे व आकाराचे होते.
२६
प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती.
२७
त्याने ते करूब, त्यांचे पंख पसरलेले असे मंदिराच्या अगदी आतील खोलीत ठेवले. एका करुबाचे पंख एका भिंतीला स्पर्श करत होते, तर दुसऱ्या करुबाचे पंख दुसर्या भिंतीला स्पर्श करत होते आणि त्यांचे पंख खोलीच्या मध्यभागी एकमेकांना स्पर्श करत होते.
२८
त्याने करुबांना सोन्याचे आवरण दिले.
Settings