शलमोनाचे अतुलनीय ज्ञान
1 राजे ४:२९-३४
२९
परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.
३०
पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते.
३१
इतर मनुष्यांपेक्षा, म्हणजेच एज्रावासी एथान, माहोलचे पुत्र हेमान, कल्कोल व दारदापेक्षा शलोमोन ज्ञानी होता. आणि त्याची किर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांपर्यंत पसरली.
३२
शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली.
३३
लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.
३४
शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.
Settings