1 राजे ३:६-९
६
शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला.
७
“तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही.
८
आपला सेवक तर आपण निवडलेल्या लोकांमध्ये आहे, जे इतके मोठे व अगणित आहेत.
९
म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings