1 राजे ३:४-५
४
राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली.
५
गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”