1 राजे ३:२-३
२
तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते.
३
उच्च स्थानावर जाऊन यज्ञार्पणे करणे व धूप जाळणे, याशिवाय आपला पिता दावीदाने दिलेल्या सूचनांनुसार शलोमोन चालला व त्याने याहवेहवरील त्याची प्रीती व्यक्त केली.