1 राजे २१:२०-२४
२०
अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.
२१
याहवेह म्हणतात, ‘मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. मी तुझी संतती नष्ट करून टाकीन व इस्राएलात अहाबाच्या कुटुंबातून प्रत्येक शेवटचा पुरुष; तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, तो मी उपटून टाकीन.
२२
मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’
२३
“आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ ईजबेलला कुत्रे खातील.’
२४
“अहाबाच्या संबंधातील लोक जे शहरात मरतील त्यांना कुत्रे खातील, आणि वेशीच्या बाहेर जे मरतील त्यांना आकाशातील पक्षी खातील.”
Settings