Skip to content
1 राजे १५:१७-२३

1 राजे १५:१७-२३

१७
यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.
१८
त्यानंतर आसाने याहवेहच्या मंदिरातील आणि त्याच्या राजवाड्यातील भांडारात उरलेले सर्व चांदी व सोने काढून घेतले व ते आपल्या सरदारांच्या हाती स्वाधीन करून त्यांना हेजीओनचा पुत्र ताब्रिम्मनचा पुत्र बेन-हदाद, अरामचा राजा जो दिमिष्कात राज्य करीत होता त्याच्याकडे पाठवले.
१९
आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोन्याची भेट पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
२०
बेन-हदद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठविले. त्याने इय्योन, दान, आबेल-बेथ-माकाह आणि नफतालीसहीत संपूर्ण किन्नेरेथवर विजय मिळविला.
२१
बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबवून तिरजाह येथे राहिला.
२२
मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
२३
आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options