Skip to content
1 राजे १:१५-२२

1 राजे १:१५-२२

१५
तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती.
१६
बथशेबाने राजासमोर लवून दंडवत घातले. राजाने विचारले, “तुला काय पाहिजे?”
१७
ती त्यांना म्हणाली, “माझे स्वामी, मी तुमची दासी, मला तुम्ही तुमच्या याहवेह परमेश्वराची शपथ दिली होती की: ‘माझ्यानंतर तुझा पुत्र शलोमोन हाच राजा होईल, आणि तो माझ्या राजासनावर बसेल.’
१८
परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही.
१९
त्याने मोठ्या संख्येने पशू, पुष्ट वासरे आणि मेंढरे यांचा यज्ञ केला आणि त्याने राजाच्या सर्व पुत्रांना, अबीयाथार याजक आणि सैन्याचा सेनापती योआब यांना आमंत्रित केले, पण आपला सेवक शलोमोनला त्याने बोलाविले नाही.
२०
माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार.
२१
नाहीतर, माझे स्वामी त्यांच्या पूर्वजांबरोबर विसावा पावतील आणि मला आणि माझा पुत्र शलोमोनला दोषी असल्याची वागणूक दिली जाईल.”
२२
ती राजाबरोबर बोलत असतानाच, नाथान संदेष्टा आला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options