Skip to content
1 योहान ५:५-१२

1 योहान ५:५-१२

जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
याबद्दल तिघे जण साक्ष देतात:
आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे.
आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे, कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे.
१०
जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;
११
हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे.
१२
ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options