Skip to content
1 योहान ५:१-५

1 योहान ५:१-५

येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात.
आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे.
परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत
कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options