Skip to content
1 इतिहास ७:६-१३

बिन्यामीन व नफताली यांची वंशावळ

1 इतिहास ७:६-१३
६
बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.
७
बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.
८
बेकेराचे पुत्र: जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ.
९
ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.
१०
यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
११
हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
१२
ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
१३
नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.