1 इतिहास ७:१३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
११
हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
१२
ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
१३
नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.
१४
मनश्शेहचे वंशज: त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला.
१५
माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.
१६
माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
Settings