1 इतिहास ५:२०-२२
२०
त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.
२१
त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.
२२
बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.
Settings