1 इतिहास २६:२८
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २८ दाखवत आहे.
२५
एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
२६
(हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत.
२७
लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत.
२८
शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
२९
इसहार्यांपैकी: कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
३०
हेब्रोन्यांपैकी: हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
३१
हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले.
Settings