Skip to content
1 इतिहास १४:१३-१७

पलिष्ट्यांचा दुसरा पराभव

1 इतिहास १४:१३-१७
१३
पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्‍यात हल्ला केला.
१४
तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.
१५
तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”
१६
तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्याला ठार केले.
१७
दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options