Skip to content
1 इतिहास ११:१-३

सर्व इस्राएलवर दावीदाचा राजा म्हणून अभिषेक

1 इतिहास ११:१-३
मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.
मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”
जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options