Skip to content

Myrtle बद्दल बायबलमधील वचने

4 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”

  2. मी वाळवंटात देवदारू, बाभळी, मेंदी, जैतून लावेन. गंधसरूची झाडे माळरानात लावेन, चिनार व भद्रदारूची झाडे ही लावेन.

  3. काटेरी झुडपांच्या ऐवजी तिथे, सुरूचे वृक्ष वाढतील, आणि तिथे रिंगणीच्या जागी मेंदीची झाडे वाढतील. हे याहवेहच्या नामाच्या थोरवीकरिता असेल जे अनंतकाळपर्यंत टिकेल, असे ते सर्वकाळचे चिन्ह होईल.”

  4. रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.