Investigation बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे!
सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत.
जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; जी उणीव आहे, ती मोजता येत नाही.
मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”
मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्याचा पाठलाग केल्यासारखे आहे.
कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.
मी स्वतःशी म्हटले, “आता ये, चांगले काय आहे, ते शोधण्यासाठी आनंदाने मी तुझी पारख करतो.” पण ते देखील व्यर्थच असे सिद्ध झाले.
मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?”
मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते.
मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले.
मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.
त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.
मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते.
मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.
माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.
माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
मग मी सुज्ञान समजून घ्यावे, आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष काय करू शकतो?
उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या.
उपदेशकाने योग्य शब्दांचा शोध केला आणि त्याने जे काही लिहिले ते यथार्थ व सत्य होते.
सुज्ञानाची वचने पराणीप्रमाणे आहेत, त्यांच्या शब्दांचा संग्रह एका मेंढपाळाने दिलेल्या घट्ट रोवलेल्या खिळ्यांप्रमाणे आहेत.
याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा. अधिक पुस्तके लिहून ठेवायला अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास केल्याने शरीर थकते.
आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.
कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल, ती चांगली असो किंवा वाईट, त्याचा परमेश्वर न्याय करतील.