Skip to content

Holiday बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.

  2. सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.

  3. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  4. आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.

  5. त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे.

  6. तसेच जनावरे, वनपशू या दोघांनाही तिथे चरावयाची मोकळीक आहे.