Booth बद्दल बायबलमधील वचने: Prescribed for the Israelites to dwell in, during the Feast of Tabernacles, to celebrate their wanderings in the wilderness
Prescribed for the Israelites to dwell in, during the Feast of Tabernacles, to celebrate their wanderings in the wilderness बद्दल वचने
पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.
हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा.
या सात दिवसात इस्राएली वंशातील सर्वांनी डहाळ्याच्या मंडपात राहावे
यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”
तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले.