Anointing Oil बद्दल बायबलमधील वचने: Formula of, given by Moses
Formula of, given by Moses बद्दल वचने
मग याहवेह मोशेला म्हणाले,
“पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड,
पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन भरून जैतुनाचे तेल.
यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.
इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे.
इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे.
जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ”