Adoni-Bezek बद्दल बायबलमधील वचने: King of Bezek.
King of Bezek. बद्दल वचने
जेव्हा यहूदाहने आक्रमण केले, याहवेहने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांनी बेजेक इथे दहा हजार लोकांचा वध केला.
बेजेक इथे त्यांना अदोनी-बेजेक सापडला आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध युद्ध करून कनानी आणि परिज्जी लोकांचा नायनाट केला.
अदोनी-बेजेक पळून गेला, परंतु त्यांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडले आणि त्याच्या हातांचे आणि पायांचे आंगठे कापले.
त्यानंतर अदोनी-बेजेक म्हणाला, “ज्या सत्तर राजांच्या हातापायांचे आंगठे कापून टाकले आणि ते माझ्या मेजाखालचे तुकडे उचलतात. आता परमेश्वराने मला त्याची परतफेड दिली आहे.” त्यांनी त्याला यरुशलेमला आणले आणि तिथे तो मरण पावला.