Skip to content

Geshem

4 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Gashmu

Geshem चा उल्लेख असलेली वचने

  1. पण होरोनी सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीयाह आणि गेशेम अरबी यांनी आमच्या या योजनेबद्दल ऐकले, तेव्हा ते आमची थट्टा व उपहास करून म्हणाले, “हे तुम्ही काय करीत आहात? राजाविरुद्ध बंड करता काय?”

  2. सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते,

  3. तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला असा निरोप पाठविला, “ये, आपण ओनोच्या मैदानातील एका खेडेगावात भेटू या.” पण ते मला दुखापत करण्याचा कट करीत असल्याचे मला समजले,

  4. त्या पत्रात असा मजकूर होता: “देशादेशात असे ऐकिवात येत आहे की—गेशेमचे म्हणणे आहे की हे सत्य आहे की, यहूदी लोक बंड करण्याची योजना आखीत आहेत आणि त्यासाठीच तू हा तट बांधत आहेस. असेही म्हटले जाते की तू त्यांचा राजा बनणार आहेस,