Skip to content

स्तोत्रसंहिता५३

मूर्खाचा नकार व सार्वत्रिक भ्रष्टता

१
संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.
२
मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.
३
प्रत्येकजण भटकून गेलेला आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

देव जुलमींचा न्याय करतो

४
दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून टाकतील. ते कधीही परमेश्वराला हाक मारत नाहीत.
५
पण पाहा, जिथे भिण्याचे कारण नव्हते, तिथे ते भयाने भरले. परमेश्वराने त्यांची हाडे विखरून टाकली, ज्यांनी तुमच्याविरुद्ध तळ दिला होता; तुम्ही त्यांची फजिती केली, कारण ते परमेश्वराद्वारे लज्जित झाले आहेत.

पुनर्स्थापनेसाठी प्रार्थना

६
अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा परमेश्वर त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options