Skip to content

स्तोत्रसंहिता१३८

दावीदाचे स्तोत्र. हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.
उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.
जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.
हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.
ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.
याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.
मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.
याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options