Skip to content

स्तोत्रसंहिता १२८

परमेश्वराचे भय बाळगण्याचे आशीर्वाद १–२

१
प्रवाशांचे आराधना गीत. जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
२
तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

घरात व कुटुंबात समृद्धी ३–४

३
तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
४
होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.

सीयोनकडून व इस्राएलसाठी आशीर्वाद ५–६

५
याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.
६
नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.